अखेर समोर आला अमृता रावच्या बाळाचा फोटो

पती आरजे अनमोलने केला सोशल मीडियावर शेअर

अखेर समोर आला अमृता रावच्या बाळाचा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव अनेक वर्ष चित्रपटसृष्टीतून दूर जरी असली, तरी बॉलिवूडच्या काही पार्ट्यांमध्ये पती आरजे अनमोल सोबत ती दिसून येते. अमृताच्या चाहत्यांवर्गात आजदेखील घट झाली नसून, अमृताचे रेग्युलर अपडेट ते घेताना दिसून येतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमृताने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे, मात्र अमृता आणि आरजे अनमोल यांपैकी अद्याप कोणीही त्यांच्या बाळाचा सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. त्यामुळे, मुलाच्या जन्मानंतर जवळपास चार महिन्यांनी अमृताच्या मुलाचा फोटो समोर आला आहे. अमृताचा पती आरजे अनमोल याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलाचा एक गोड फोटो शेअर केला आहे. अनमोलने शेअर केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

अनमोलने शेअर केलेल्या या फोटोत अमृता अनमोलसोबत लहानगा वीर खेळत असल्याचं दिसत आहे. “आमचं जग..आमचा आनंद” असं कॅप्शन त्यानं या व्हिडीओला दिले असून, या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडतो आहे.

अमृताने २००२ सालात आलेल्या ‘अब के बरस’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 'इश्क विश्क', 'मै हूं ना' ,' विवाह' अशा सिनेमांमधून ती झळकली. सध्या अमृताने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे. आपल्या बाळाच्या पालपोषणामध्ये ती व्यस्त आहे. सध्या ती तिचे मातृत्व नव्याने जगत आहे.