'अलबत्या गलबत्या' नाटकाचा सेट चोरीला !

श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

'अलबत्या गलबत्या' नाटकाचा सेट चोरीला !

गेली १५-१६ वर्षे नाट्य सृष्टीला सुपरहिट नाटकं देणारे अव्दैत थिएटरचे निर्माते राहुल मधुकर भंडारे यांच्या  "अलबत्या गलबत्या" या नाटकाने अनेक विश्वविक्रम केले. नाटक सोबतच नाटकाचे आकर्षण ठरलेला नाटकाचा सेट देखील नाट्य क्षेत्रासहित प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे.

यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊन च्या काळात सर्व थेटर सहित नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे माझ्या अलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या गोडाऊनमध्ये कोळसा बंदर, काळा चौकी येथे ठेवण्यात आला होता.

मात्र तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न देता सुरेश सावंत यांनी गोडाऊन मालकास खोटे सांगून गोडाऊन मधून चोरून श्रेयस तळपदे यांच्या OTT प्लॅटफॉर्म  च्या भक्षक या एकांकिकेच्या शूट साठी वापण्यात आला.

महाराष्ट्रभर नाट्यगृह चालू ठेवण्यास मनाई असताना देखील लॉकडाऊन काळातील शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत, बेकायदेशीररित्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे अलबत्याचा गलबत्या नाटकाचा सेट वापरून हे कमर्शिअल शूटिंगसाठी करण्यात आले.  

अलबत्या गलबत्या या नाटका निघडीत सर्व प्रापर्टी, सेट, इ., हे  अव्दैत थिएटर संस्थेची Intellectual property असून निर्माते राहुल भंडारे यांच्या  परवानगीशिवाय वापरली असल्यामुळे ही शूटिंग कुठेही रिलीज करू नये अन्यथा Intellectual property rights अंतर्गत श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा अर्ज शिवडी पोलिस स्थानकाला दिला आहे. 

​​​​​​

निर्माते राहुल भंडारे यांचा तक्रार अर्ज शिवडी पोलिस स्थानकत स्वीकारला असून पोलिसांन मार्फत अभिनेते श्रेयस तळपदे सोबतच सुरेश सावंत यांची चौकशी होणार आहे.