अण्णा नाईक परत येणार...

अण्णा नाईक परत येणार...

सगळ्यांची आवडती मालिका अर्थात रात्रीचे खेळ चाले चे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या दोन पर्वांप्रमाणे या तिसऱ्या पर्वतही तितकेेच गूढ प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या आगामी पर्वाचा एक लक्षवेधी प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मंबईच्या लोकलमधला रात्रीचा हा प्रसंग आहे. सर्व प्रवासी गप्पा-गोष्टींमध्ये गुंग असतानाच, त्यांना ट्रेनच्या सर्व डब्ब्यांवर ‘अण्णा नाईक परत येणार…अण्णा नाईक परत येणार..’, असे लिहलेले पहायला मिळतेय. हे पाहून प्रत्येक जण अण्णा नाईकांची खिल्ली उडवतो. तेवढ्यात अचानक बाहेर खिडकीतून अण्णा नाईक दिसतात आणि त्यांचा दरारासुध्दा पाहायला मिळतो. सर्वच प्रवाशी क्षणार्धात दचकतात. तर, खिडकीतूनच ‘अण्णा नाईक परत येणार…’ म्हणत अण्णा वाऱ्याच्या वेगाने गायब होतात.

पाहा ‘हा’ भन्नाट प्रोमो!

या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मालिका कशी असणार आहे, याची झलक पाहायला मिळतेय, पहिल्यांदाच हा प्रोमो पाहणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. याचाच अर्थ यंदाच्या पर्वात अण्णा नाईकांचा दरारा आणि भय आणखी वाढणार आहे.

तळकोकणातल्या अण्णा नाईकांच्या कुटुंबाची कथा सुरुवातीपासूनच गाजत होती. सुरुवातीला कोकणची बदनामी होते म्हणून मालिकेला विरोध झाला. पण जसजसे कथानक पुढे सरकत गेले, तसतसा हा विरोधही मावळत गेला. पहिल्या पर्वात अण्णा नाईक मेलेले दाखवले होते, आणि कथानक पुढे नेले होते. पण दुसऱ्या पर्वामध्ये मात्र अण्णांचा पूर्ण जीवनपटच दाखवला होता. या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच लोकांनी कार्यक्रमाला डोक्यावर घेतले होते. त्यामुळे आत तिसऱ्या पर्वाकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.