विनोदी अभिनेता भूषण कडूच्यी पत्नी कांदबरी यांचे कोरोनामुळे निधन

विनोदी अभिनेता भूषण कडूच्यी पत्नी कांदबरी यांचे कोरोनामुळे निधन

मराठी बिग बॉस फेम आणि कॉमेडी अभिनेता भूषण कडू यांच्या पत्नी कांदबरी कडू यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी कांदबरी कडू यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु कोरोनासोबत लढाई करण्यास त्या अयशस्वी ठरल्या. वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.
भूषण कडू यांच्या जवळच्या मित्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला की, भूषण कडू यांच्या पत्नीचं कोविडमुळे निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून ती कोरोनाविरुद्ध झुंज देत होती. सुरुवातीला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये तिला उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर तिथून केईएम रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्नी कांदबरीच्या निधनानं भूषण कडूसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
भूषण कडू यांना ७ वर्षाचा मुलगा आहे. आई कांदबरीच्या अचानक जाण्याचं कडू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कांदबरी या भूषण कडू यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. प्रकिर्थ कडू असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. ज्यावेळी भूषण कडू यांनी मराठी बिग बॉसमध्ये एन्ट्री  घेतली होती. तेव्हा मुलगा आणि पत्नी यांना एका एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं होतं. भूषण कडू हा सर्वोत्तम मराठी विनोदी अभिनेता आहे. टीव्ही कॉमेडी एक्सप्रेस शोमधील त्याने साकारलेल्या भूमिकांचं चाहत्यांनी अनेकदा कौतुक केले आहे.