स्नेहाची जुनी मुलाखत व्हायरल, दुसऱ्या पतीने दिली ही प्रतिक्रिया

एका हिंदी मालिकाविश्वातील अभिनेत्रीच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण !!

स्नेहाची जुनी मुलाखत व्हायरल, दुसऱ्या पतीने दिली ही प्रतिक्रिया

हिंदीच्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ सध्या.बिग बॉस मराठी सिझन ३ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. स्नेहाचा चाहतावर्ग मोठा असून, बिग बॉस मराठी सिझन ३ च्या पहिल्या दिवसांपासून ती चर्चेत आहे. तिच्या  दोन अयशस्वी लग्नांबद्दलच्या चर्चा रंगत असतानाच, २०१८ मध्ये तिने  दिलेली एक मुलाखत व्हायरल झाली आहे. ह्या मुलाखतीमध्ये स्नेहाने तिच्या दोन्ही अपयशी ठरलेल्या लग्नांचा खुलासा करत त्यामागचे कारणदेखील सांगितले होते. आता ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, ती मुलाखत पाहून स्नेहाच्या दुसऱ्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे. 

स्नेहा बिग बॉसच्या घरात गेल्यावर तिची ही जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. त्यानंतर तिच्या दुसऱ्या पतीने तिचा मानसिक झळ केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते पाहून अनुराग सोलंकीची मैत्रीण आणि अभिनेत्री काम्या पंजाबीने स्नेहाला आपल्या ट्विटद्वारे फटकारले होते. "तुला बिगबॉसमध्ये सहभागी व्हायचं होत ही चांगलीच गोष्ट आहे, त्यानुसार तू आली सुद्धा, पण व्हिक्टीम कार्ड कशाला खेळतेस? तुझ्या पहिल्या लग्नाविषयी काही कल्पना नाही, पण निदान तुझ्या दुसऱ्या लग्नाविषयी तरी काहीही कहाण्या करून सांगू नकोस. ते सुद्धा केवळ या चार दिवसांच्या खेळासाठी तुमच्या चांगलंच माहितीये मी सत्य बाहेर आणू शकते. अशा वाईट पद्धतीने खेळ नकोस, असं ट्विट तिने केले होते. तिच्या ह्या ट्विटमुळे स्नेहाच्या त्या जुन्या मुलाखतीचे पान नव्याने उघडण्यात आलं आहे.  

ह्या ट्विटवर स्नेहाचा पूर्वाश्रमीचा दुसरा पती अनुराग सोलंकीने काम्या पंजाबीला धन्यवाद देणारे ट्विट केले. ‘गेमसाठी लोकं कोणत्याही थराला जातात हे पाहून मला धक्काच बसला. मला यावर काहीच बोलायचे नाही पण स्नेहा एक विनंती आहे की जेव्हा तू बिग बॉसच्या घरातून बाहेर येशील तेव्हा मी तुझा झळ केला याचे काही पुरावे असतील तर ते जगाला दाखव’ या आशयाचे ट्वीट अनुरागने केले आहे. त्याच्या ह्या ट्विट नंतर स्नेहाच्या चाहत्यांनी त्याच्यावर तोंडसुख देखील घेतले असल्याचे दिसून येत आहे. 

स्नेहाने वयाच्या १९व्या वर्षी अविष्कार दार्वेकरशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.अविष्कार आणि स्नेहाने घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१५मध्ये स्नेहाने अनुराग सोलंकीशी दुसऱ्यांदा लग्न केले. लग्नाच्या आठ महिन्यांनंतर अनुराग आणि स्नेहाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

‘तो चुकीचा माणूस होता असे मी म्हणणार नाही, पण हो, तो माझ्यासाठी योग्य नव्हता. दोन अपयशी विवाहांनंतर, मला समजले की पुरुषांना जिद्दी महिला आवडत नाहीत. माझा स्वभाव खूप मृदू आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळेही मी घाबरते. आता मी ठामपणे सांगू शकते की लग्न ही संकल्पना माझ्यासाठी नाही. आपल्या समाजात फक्त पुरुषच कुटुंबीयांची काळजी घेऊ शकतात असा समज आहे. पण हे सत्य नाही. मला स्वत:वर विश्वास आहे आणि मी माझ्या कुटुंबीयांची काळजी घेऊ शकते’ असे स्नेहा म्हणाली होती.