बॉलिवूडवर कोरोनाचं सावट

रणबीर, अमीरनंतर आता मिलिंद सोमण कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूडवर कोरोनाचं सावट

राज्यासह देशात करोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलं आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढतेय. एकीकडे लसीकरण सुरु करण्यात आलं असले तरी कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येते आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये देखील करोनाचा संसर्ग वाढत आहे. अभिनेता रणवीर कपूरनंतर, आमिर खान, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी यांना करोनाची लागण झाली. तर आर माधवनला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. त्यानंतर आता फिट आणि हिट असलेल्या अभिनेता मिलिंद सोमणलादेखील करोनाची लागण झाली आहे.

मिलिंद सोमणने एक ट्विट करत याची माहिती दिली आहे. “पॉझिटिव्ह टेस्ट आली.” असं ट्विट त्याने केले आहे. त्याचसोबत तो क्वारंटीन झाला असल्याचे देखील त्याने सांगितले. 

मराठी सिनेसृष्टीतली प्रसिद्ध जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी देखील गेल्या आठवड्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त कळवले होते. या दोघांनी देखील होम क्वारंटाईन होत, विशेष काळजी घेतली होती. त्यानुसार उमेशने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर दोघांच्या तब्येतीत जलद सुधारणा होत असल्याची पोस्ट केली.