PHOTO स्वप्नालीच्या हातावर सजली आस्तादच्या नावची मेहंदी

१४ फेब्रुवारीला कोर्ट मेरीज पद्धतीने करणार लग्न

PHOTO स्वप्नालीच्या हातावर सजली आस्तादच्या नावची मेहंदी

पुढचे पाऊल फेम आणि बीगबॉस मराठी सीजन १ चा स्पर्धक आस्ताद काळे ची लव्हस्टोरी जगजाहीर आहेच ! छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटी कपलमध्ये अग्रगणी नाव असलेलि जोडी स्वप्नाली पाटील आणि आस्ताद काळे उद्या व्हेलेटाइन डे च्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकत आहेत. 

ह्या दोघांचा कोर्ट मेरिज पद्धतीने विवाह होणार आहे.

 

आज स्वप्नालीच्या घरी तिच्या मेहंदीचा कार्यक्रम रंगला,

 

स्वप्नालीने हिरव्या रंगाचा सुरेख ड्रेस परिधान केला होता. शिवाय फ्लोरल ज्वेलरी मध्ये ती खुलून दिसत होती.
 

 

स्वप्नाली आणि आस्ताद एकमेकांचे अनेक वर्षापासुनचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यातील मैत्रीचे प्रेमात रुपांतर 'पुढचे पाऊल' मालिकेच्या सेटवर झाले. आस्तादने स्वप्नाली बरोबरच्या त्याच्या नात्याची कबुली बिग बॉसच्या घरात दिली. त्यादरम्यान स्वप्नाली पाटीलच्या घरच्यांना त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हते. 

 

 

दोघांच्या घरच्यांच्या संमतीने ह्या दोघांचे प्रेम फुलत गेले, आणि आता ते लवकरच सुखी वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाला लागणार आहेत.