गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘चंद्रमुखी’चा टीझर प्रदर्शित!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘चंद्रमुखी’चा टीझर प्रदर्शित!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘चंद्रमुखी’चा टीझर प्रदर्शित! नुकताच ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चंद्रमुखीचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर चर्चेत असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेता प्रसाद ओक करत आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने “आनंद होतोय जाहीर करताना नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला, ‘चंद्रमुखी’ येणार तुमच्या भेटीला मंगलमयी ‘दिवाळी पाडव्याला'” असे कॅप्शन दिले आहे. चंद्रमुखी हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली असून अजय-अतुल या लोकप्रिय जोडीने सांगीत दिले आहे. तसेच या चित्रपटाची, पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. पण चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे अद्यप स्पष्ट झालेले नाही. चित्रपट दिवाळीत ५ नोव्हेंबर २०२१मध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.