‘एका लग्नाची पुढची गोष्ट' चे यशस्वी ४०० प्रयोग

'लग्नाळू' आठवडा सेलिब्रेशन

‘एका लग्नाची पुढची गोष्ट' चे  यशस्वी ४०० प्रयोग

मराठी रंगभूमीला वाहून घेतलेले आजच्या पिढीतील नट असं ज्यांचं यथार्थ वर्णन प्रत्येक मराठी माणूस अभिमानानं करतो त्या प्रशांत दामलेंच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या सदाबहार नाटकाची ४००व्या प्रयोगाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. एका लग्नाची ही खुमासदार आणि खुसखुशीत गोष्ट रसिकांनी इतकी डोक्यावर घेतली की, लॅाकडाऊननंतर पहिला प्रयोग 'हाऊसफुल्ल’ करत त्यांनी प्रशांत दामलेंवरील प्रेमाची जणू पोचपावतीच दिली. रसिक मायबापानं दिलेल्या याच प्रेमाच्या बळावर 'एका लग्नाची पुढची गोष्ट' हे नाटक ४०० प्रयोगांचा टप्पा गाठण्यात यशस्वी झालं आहे.

प्रशांत दामले फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, सरगम प्रकाशित, झी मराठी प्रस्तुत 'एका लग्नाची पुढची गोष्ट'च्या पुढील प्रयोगांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यात ६ मार्च ते १४ मार्चपर्यंत 'लग्नाळू आठवडा' म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

या सप्ताहाची पहिली सुरुवात दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे ६ मार्चला दुपारी ४:३० वाजता होणार आहे. त्यानंतर डॅा. काशिनाथ घाणेकर, गडकरी रंगायतन, सावित्रीबाई फुले नाट्यगृह प्र. ठाकरे नाट्यगृह, यशवंतराव चव्हाण, रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड, आणि बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे सेलिब्रेट करण्यात येईल.