लसीकरण केंद्रावरची गैरसोय पाहून अभिनेता हेमंत ढोमे संतापला !

लसीकरण केंद्रावरची गैरसोय पाहून अभिनेता हेमंत ढोमे संतापला !

लसींच्या कमतरतेची समस्या देशात भासत असली तरी काही ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लसीकरणासाठी नागरिकांच्या भल्यामोठ्या रांगा लागत आहेत. गोरेगाव नेस्को येथे लसीकरणासाठी लागलेली रांग आणि त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याबद्दल अभिनेता हेमंत ढोमेने संताप व्यक्त केला आहे.

हेमंतने लसीकऱण केंद्रावरची गर्दी आणि त्यामुळे होणारी असुविधा यावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, “सर्व नियम पाळणारा... सरकार ला प्रामाणिक पणे टॅक्स भरणारा... या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणुस आत्ता आरोग्य सुविधांसाठी (जगण्यआसाठी) रांगेत उभा आहे! उन्हा-तान्हाचा कुठल्याही सावली शिवाय... खूप वय असलेला, थकलेला! आत्ता नेस्को (गोरेगाव, मुंबई) बाहेर लांब रांग!.”

सध्या देश करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशात तसंच राज्यातही दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे वैद्यकीय सुविधांची कमतरता भासू लागली आहे.