रागामुळे जया बच्चन पुन्हा झाल्या ट्रॉल

सेल्फी काढणा-या चाहत्याला ढकलले

रागामुळे जया बच्चन पुन्हा झाल्या ट्रॉल

बच्चन कुटुंबियांची 'बडी माँ' जया बच्चन त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. शिवाय सार्वजनिक स्थळावरील त्यांची प्रसार माध्यमे, छायाचित्रकार आणि चाहत्यांबरोबरचे वर्तणूक देखील चांगले नसल्याचे दिसून आले आहे.  त्यामुळे त्या सोशल मीडियावर ट्रोल देखील झाल्या आहेत. असेच काही तरी जया बच्चन यांच्यासोबत पुन्हा एकदा घडले आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणूक सुरू आहेत. तर TMC पक्षासाठी प्रचार करताना जया बच्चन दिसल्या. त्या प्रचार रॅलीमधला त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जया बच्चन या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी प्रचारात सहभागी झाल्या होत्या. त्या रॅलीतला हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत जया बच्चनसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चाहत्याला धक्का मारुन त्यांनी खाली ढकलले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.