रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेलं अप्रतिम विनोदी नाटक “लॉन्ग लाइफ”

रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेलं अप्रतिम विनोदी नाटक “लॉन्ग लाइफ”
review

आयुष्य जर सुंदर असेल तर “लॉन्ग लाइफ” जगावसं वाटतं, पण तेच आयुष्य निराशजनक असेल तर जगणंही व्यर्थ वाटू लागतं. कुलस्वामिनी निर्मित, श्रध्दा कलामंच प्रकाशित, सौ. मिनाक्षी मिलिंद डोंगरगावकर व प्रकाश नारायण माचकर निर्मित “लॉन्ग लाइफ” हे नाटक सध्या रंगभूमीवर सुरू आहे. लॉकडाउननंतर प्रथमच मुंबईत दामोदर हॉल, परेल येथे शुभारंभाचा प्रयोग करून धाडसी प्रयत्न करणार्या. “लॉन्ग लाइफ” हया नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेली वर्षभर कोरोनाच्या हया लॉकडाउनमुळे सर्व कलाक्षेत्रातील व्यक्तींना तसेच कलाप्रेमींना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आहे. पण त्यातही हार न मानता पुन्हा नव्या जोमानं उभं राहून एखादी नवी कलाकृती सादर करून कलाक्षेत्रातील अनेकांना काम देवून रसिकांचं मनोरंजन करणं, हा निर्मात्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

“लॉन्ग लाइफ” हे नाटक काल्पनिक कथेवर आधारित असून माणूस सुख दुख:च्या हिंदोळ्यात आपले आयुष्य जगत असताना, एखाद्या घडलेल्या घटनेने निराश झालेल्या माणसाच्या आयुष्यात यूटर्न येवून त्याचे तुटलेले नातेसंबंध कसे जोडले जातात, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. नात्याची सांगड घालताना विनोदी अंगाने जाणारं हे नाटक माणसाच्या जीवनातील प्रत्येक स्वभावाचे दर्शन घडवितं. गेली २५ वर्ष मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजविणारे प्रकाश नारायण माचकर यांनी हया नाटकाची निर्मिती, लेखन व दिग्दर्शन केले आहे. कित्येक वर्ष मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजविणारे नेपथ्यकार उल्हास सुर्वे यांनी नेपथ्याची बाजू बजावली असून १५०० पेक्षा जास्त नाटकांना पार्श्वसंगीत देणारे अनेक पुरस्कार प्राप्त संगीतकार आनंद कुबल यांनी या नाटकाच्या शीर्षक गीताबरोबरच पार्श्वसंगीताची बाजू सांभाळली आहे. रंगभूषा चंदर पाटील, प्रकाश योजना लक्ष्मण केळकर, केशभूषा धनश्री पालव, वेशभूषा रमेश चाळके तर नृत्य दिग्दर्शन संदिप येलवे यांनी केले आहे. सहनिर्माते अनिरुध्द माचकर, डॉ. अपर्णा प्रभू व कलाप्पा कोळी, विशेष सहकार्य बाबु राणे, रंगमंच व्यवस्था आशिष कलिंगण यांची असून सुत्रधार हरी पाटणकर, भालचंद्र नाईक व सुरेश भोसले हे आहेत. यात प्रकाश माचकर, मिनाक्षी डोंगरगावकर, यशवंत शिंदे, संदीप येलवे, कल्पना कदम, स्वप्नील कानेरकर, विलक्षणा मोरे, सुरेश चव्हाण यांच्या प्रमुख भुमिका आहेत.