‘Miss India 2020’ मानसा वाराणसी

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाचा मिस इंडिया कॉन्टेस्ट ऑनलाईन आयोजीत करण्यात आला होता.

‘Miss India 2020’ मानसा वाराणसी

फेमिना मिस इंडिया २०२०चा ग्रॅंड फिनाले बुधवारी रात्री म्हणजे १० फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडला. देशातील सगळ्यात मोठ्या आणि बहुचर्चीत असलेल्या मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्ट २०२०ची विजेता मानसा वाराणसी ठरली आहे. तर हरियाणाची मणिका शोकंद मिस ग्रॅंड इंडिया २०२० ठरली आणि उत्तरप्रदेशची मान्या सिंह ही मिस इंडिया २०२०ची रनरअप ठरली आहे.

 

 

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाचा मिस इंडिया कॉन्टेस्ट ऑनलाईन आयोजीत करण्यात आला होता. मिस इंडियाचे हे ५७ वे पर्व होते. फेमिना मिस इंडिया २०२०चे आयोजन मुंबईतील हयात रिजेंसी हॉटेलमध्ये करण्यात आले होते. अभिनेत्री वाणी कपूर, चित्रांगदा सिंह, नेहा धुपिया, अभिनेता अपारशक्ति खुराणा आणि पुलकित सम्राट यांनी हजेरी लावली होती. तर अपारशक्तिने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले होते. पुलकित सम्राट आणि चित्रांगदा या फिनालेचे पॅनलिस्ट होते. तर वाणी स्टार परफॉर्मर होती.

मिस इंडिया ठरलेली मानसा वाराणसी ही २३ वर्षांची आहे. या आधी तिने मिस तेलंगणा हा किताब जिंकला होता. खुशी मिश्रा, मान्या सिंह, मानसा, रती हुलजी आणि मणिका शोकंद या फेमिना मिस इंडियाच्या टॉप ५ फायनलिस्ट होत्या.