रसिका सुनीलची नवी झेप

रसिका सुनीलची नवी झेप

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनिलने साकारलेली 'शनाया' आजही लोकांच्या मनात आहे. रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. मालिका संपली जरी असली तरी रसिका सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टीव्ह असते. ती नेहमी ग्लॅमर आणि बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना भुरळ घालताना दिसते.

मालिका संपल्यानंतर रसिका सध्या सुट्टी एन्जॉय करतेय. रसिकाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हेलिकॉप्टर चालवण्याचं प्रशिक्षण घेत असतानाचा व्हिडीओ रसिकाने शेअर केला आहे. तिच्या ह्या व्हिडीओवर चाहत्यांचा पाऊस पडत आहे.