सातव्या राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठीचा डंका

'प्रवास' चित्रपट आणि 'रेड' लघुपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पुरस्कार

सातव्या राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठीचा डंका

मानाच्या समजल्या जाणाऱ्या अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत विविध पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या ‘रेड’ या मराठी लघुपटाने आणखी एका पुरस्कारावर आपली छाप उमटवली आहे. सातव्या राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘रेड' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा आणि सर्वोत्तम दिग्दर्शकीय पुरस्काराचा बहुमान प्राप्त झाला आहे. महोत्सवात समाविष्ट झालेल्या विविध राज्यांतील अनेक लघु चित्रपटांमधून ‘रेड’ला हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच चित्रपट यादीत बहुचर्चित 'प्रवास' ने देखील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शकीय पुरस्काराचा सन्मान प्राप्त केला.  

जोधपूरच्या प्रसिद्ध मेहरानगड किल्ल्यात संपन्न झालेल्या रंगतदार सोहळ्यात 'रेड' या लघुपटाच्या दिग्दर्शनासाठी सुमित पाटील यांस आणि गुणी अभिनेत्री छाया कदमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. तसेच ‘प्रवास सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा ‘विशेष ज्युरी पुरस्कार’ व शशांक उदापूरकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. यासोबत ‘प्रवास’ची ‘इफ्फी 2020’ मध्ये निवड झाल्यबद्दल चित्रपटाचे निर्माते ओम छांगाणी यांना ‘प्राईड ऑंफ राजस्थान’ (PRIDE OF RAJASTHAN) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.