भाग्यश्री लिमये ला पितृशोक

भाग्यश्री लिमये ला पितृशोक

'घाडगे अँड सून’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात  पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वडिलांचे निधन झाले आहे. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. भाग्यश्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे.

भाग्यश्रीचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे म्हटले जात आहे. सोलापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.

भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘रेस्ट इन पीस बाबा’ असे म्हटले आहे. या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.