ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस

सोशल मीडियाद्वारे डॉक्टरांचे मानले आभार

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस

कोविड १९ या विषाणूमुळे अवघे विश्व हैराण झाले आहे. या जागतिक महामारीमुळे करोडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विषाणूला प्रतिबंधित करण्याऱ्या लसीवर जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत असून, भारताने बनवलेल्या २ लसींना मान्यता मिळाल्याने देशभरात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. मराठी मनोरंजन विश्वाचे महागुरु आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी देखील ८ मार्च रोजी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. 

 

 

लसीकरण करतानाचा ब्रांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या लसीकरण केंद्रातला फोटोसुध्दा सचिन पिळगावकरांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यांच्या आईनेसुध्दा यावेळी करोना लस घेतल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच ही लस टोचणाऱ्या डॉक्टरांचे आणि तिथल्या मेडिकल स्टाफचे सुध्दा सचिन पिळगावकर यांनी आपल्या पोस्टमधून आभार मानले आहेत.