एण्‍ड टीव्‍हीवर 'और भाई क्‍या चल रहा है?'

एण्‍ड टीव्‍हीवर 'और भाई क्‍या चल रहा है?'

लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर है' असो किंवा मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'ची घरेलू कॉमेडी असो किंवा जीवनाचे सार दाखवणारी मालिका 'गुडिया हमारी सभी पे भारी' असो सतत हलके-फुलके कन्‍टेन्‍ट सादर करण्‍याला भरघोस यश मिळाल्‍यानंतर एण्‍ड टीव्‍ही आता प्रेक्षकांसाठी नवीन मालिका 'और भाई क्‍या चल रहा है'सह नवीन व स्‍वदेशी, तसेच स्‍थानिक स्‍वाद घेऊन येत आहे.

लखनौच्‍या पार्श्‍वभूमीवर आधारित ही मालिका स्थितीजनक कॉमेडीची झलक दाखवेल, जी खात्री देते की दोन विभिन्‍न संस्‍कृती असलेल्‍या कुटुंबांना एकाच छताखाली राहण्‍यास सांगण्‍यात येते तेव्‍हा निश्चितच लहान शहरातील राहणीमान आणि उच्‍च स्‍पर्धात्‍मक पत्‍नींच्‍या दैनंदिन समस्‍यांमध्‍ये बदल होणार. मालिका दोन कुटुंबं मिश्रा व मिर्झा यांच्‍या माध्‍यमातून लखनौच्‍या दीर्घकाळापासूनच्‍या गंगा-जमुनी तहजीबला सादर करते. ही दोन्‍ही कुटुंबे एका जुन्‍या नवाब हवेलीमध्‍ये राहतात. प्रत्‍येकाची ही हवेली स्‍वत:च्‍या मालकीची बनवण्‍याची आणि दुस-यासोबत शेअर न करण्‍याची इच्‍छा आहे. ज्‍यामधून रोजच्‍या समस्‍या व घटनांच्‍या अवतीभोवती गुंफलेली भांडणं व मनोरंजनपूर्ण कलह पाहायला मिळतात.

अमजद हुसैन शेख (शेड प्रॉडक्‍शन्‍स) निर्मित 'और भाई क्‍या चल रहा है?' सुरू होत आहे ३० मार्च २०२१ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर.