आई कुठे काय करते मालिकेत नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला!

आई कुठे काय करते मालिकेत नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला!
आई कुठे काय करते मालिकेत नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला!

 स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीसमोर आणखी एक संकट उभं ठाकणार आहे. एकीकडे इशाला मानसिक धक्यातून सावरण्यासाठी मदत करत असतानाच दुसरीकडे अभिषेकवर जीवघेणा हल्ला होणार आहे. डॉक्टरी पेशामध्ये असणाऱ्या अभिषेकने रुग्णांची सेवा करत आपलं कर्तव्य बजावलं आहे. कोरोनासारख्या संकटातही घरापासून लांब रहात त्याने आपल्या कामालाच पहिलं प्राधान्य दिलं. आता मात्र एका रुग्णाच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नी आणि मुलाचा खुन केल्याचा आरोप अभिषेकवर टाकला आहे. इतकंच नाही तर अभिषेकला बेदम मारहाण देखिल केली आहे. अभिषेकवरचा हा आरोप खरा आहे का? त्याची या आरोपातून कशी सुटका होणार? मुलांच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणारी अरुंधती अभिषेकला यातून कसं सावरणार? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ‘आई कुठे काय करते’ सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.