वामिका, अनुष्काचा फोटो टाकत विराटने दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

वामिका, अनुष्काचा फोटो टाकत विराटने दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा
वामिका, अनुष्काचा फोटो टाकत विराटने दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

आज दि. ८ मार्च, सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस साजरा केला जात आहे. या निमित्ताने प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील स्त्रिला महिला दिनाच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहे. क्रिकेटपट्टू विराट कोहलीने देखील त्याच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या स्त्रियांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पत्नी अनुष्का शर्मा आणि त्यांची गोंडस मुलगी वामिकाचा फोटो शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 


“एखाद्या बाळाचा जन्म पाहणे म्हणजे अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक अनुभव आहे. ते पाहिल्यानंतर, तुम्हाला एका महिलेचे सामर्थ्य समजते, आणि परमेश्वरानं मातृत्वाचं वरदान स्त्रियांनाच का दिलं हे समजते. कारण त्या पुरूषांपेक्षा शक्तिशाली आहेत. माझ्या आयुष्यातील सगळ्यात उत्कट आणि दयाळू महिलेला आणि एक जी मोठी होऊन तिच्या आईसारखी होणार तिला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जगातील एकंदरीत सर्व आदर्श महिलांनादेखील महिला दिनाच्या शुभेच्छा.” अशा आशयाचे कॅप्शन विराटने त्या फोटोला दिले आहे.


अनुष्का शर्माने ११ जानेवारी रोजी मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर १ फेब्रुवारीला आपल्या मुलीचे नवा 'वामिका' ठेवले असल्याचे तिने जाहीर केले होते.