पूजा सावंत पहिल्यांदाच स्वप्निल जोशीबरोबर रुपेरी पडद्यावर

बळी होणार १६ एप्रिल रोजी प्रदर्शित

पूजा सावंत पहिल्यांदाच स्वप्निल जोशीबरोबर रुपेरी पडद्यावर

मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वात सुंदर आणि गुणी अभिनेत्री पूजा सावंत आपल्या चाहत्यांना  पुन्हा एकदा सुखद अनुभव देण्यास सज्ज झाली आहे. ‘बळी’ या आपल्या आगामी चित्रपटात ती वेगळी भूमिका साकारते आहे. ‘बळी’या चित्रपटाबद्दल त्यातील अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी प्रेक्षकांमध्ये उत्कंठा लागून राहीली असताना पूजाची त्यातील डॉक्टरची भूमिका हे या आतुरतेचे आणखी एक कारण आहे.

‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एन्टरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेला ‘बळी’ १६ एप्रिल २०२१ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘बळी’चे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे असून त्यात प्रमुख भूमिकेत आहे, मराठीतील सुपरस्टार स्वप्निल जोशी.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पूजा पहिल्यांदाच स्वप्निल जोशीबरोबर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ‘बळी’ हा पूजाचा विशाल फुरियाबरोबरचा दुसरा चित्रपट आहे. तिने ‘लपाछापी’ या त्याच्या गाजलेल्या व प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटात काम केले होते. निर्माते ‘जीसिम्स’ने पूजाचे पूर्णाकृती छायाचित्र असलेले ‘बळी’चे एक नवे पोस्टर नुकतेच प्रकाशित केले आहे. या पोस्टरमध्ये तिच्या हातात स्टेथोस्कोप आहे आणि त्यावरून या चित्रपटात ती डॉक्टरच्या भूमिकेत आहे, हे ध्यानात येते. अत्यंत आश्वासक अशा तिच्या या लुकवरून प्रेक्षकांनाही या चित्रपटात स्वनिल आणि पुजाच्या दमदार अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार ही खात्री पटते.