महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘राधे-श्याम’चे नवे पोस्टर प्रदर्शित

प्रभासच्या आयुष्यातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक !

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘राधे-श्याम’चे नवे पोस्टर प्रदर्शित

आज संपूर्ण देशात महाशिवरात्रीची धामधूम आहे. याच मुहूर्तावर प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रभासने आपल्या सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाच्या या नव्या पोस्टरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे.
‘राधे श्याम’  ही एक प्रेमकथा आहे. ज्यात पूजा आणि प्रभासचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. प्रभास आणि पूजा चित्रपटाच्या पोस्टरवर एकत्र झळकले आहेत. चाहत्यांना हे नवीन पोस्टर खूप आवडले आहे. आपल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना प्रभासने लिहिले, ‘महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर राधे श्यामचे नवीन पोस्टर तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यात मला आनंद होत आहे.’

या चित्रपटाचे चित्रीकरण इटली आणि रोममध्ये झाले आहे. हा चित्रपट प्रभासच्या आयुष्यातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. या चित्रपटातील प्रभासच्या केवळ वेशभूषावर निर्मात्यांनी ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. त्यामुळे यात काय खास असणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत  

 

 

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी निर्मात्यांनी या चित्रपटाची एक झलक मोशन पोस्टरसह प्रसिद्ध केली होती, जी लोकांना खूप आवडली होती. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये बराच चर्चेत आहे.प्रभास आणि पूजाचा  हा चित्रपट ३० जुलै २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राधेश्याम’ हा राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित बहुभाषिक चित्रपट असेल, तर गुलशन कुमार आणि टी-सीरीज हा चित्रपट सादर करेल. यूव्ही क्रिएशन्सद्वारे तयार केल्या गेलेल्या या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, सचिन खेडकर, प्रियदर्शी, भाग्यश्री, मुरली शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वंशी आणि प्रमोद यांनी केली आहे.