देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ‘मुळशी पॅटर्न’मधील ‘आ रा रा खतरनाक’चे गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन

देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ‘मुळशी पॅटर्न’मधील ‘आ रा रा खतरनाक’चे गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन

  
प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील आ रा रा… खतरनाक… हे गाणे लिहणारे गीतकार आणि देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. प्रवीण तरडे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट शेअर करत प्रणित कुलकर्णी यांच्या निधनाची माहिती दिली असून त्यांनी भावूक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे.

नव्वदच्या दशकात महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचं झपाट्याने झालेलं विस्तारीकरण आणि वाढणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे शहरावर व परिसरावर झालेल्या परिणामाची कथा प्रविण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून मांडली होती. या चित्रपटातील गाजलेले ‘आरारारारा खतरनाक’ हे गीत प्रणीत कुलकर्णी यांनी लिहले होते. हे गाणे प्रचंड गाजले होते.