प्रियांका आणि निक करणार ही महत्वाची घोषणा !

प्रियांका आणि निक करणार ही महत्वाची घोषणा !

बॉलिवूड देसी गर्ल ते विदेसी सून झालेली प्रियांका चोप्रा आणि तिचा पती पॉपस्टार गायक निक जोनससोबत एक महत्त्वाची घोषणा करणार आहे. ही महत्त्वाची घोषणा ऑस्करसंदर्भातली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस आणि तिचा पती निक जोनस हे दोघेही सोमवारी म्हणजेच १५ मार्चला सर्व २३ विभागांमधली ऑस्कर नामांकनं जाहीर करणार आहेत. ग्लोबल लाईव्ह स्ट्रिमींगद्वारे हा सोहळा पाहता येणार आहे.

प्रियांका आणि निक या दोघांनीही सोशल मीडियावरून ही गोष्ट शेअर केली आहे. प्रियांकाने तर यांसंदर्भात आपला एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. तिने आपल्या या पोस्टमध्ये अकॅडमीलादेखील टॅग केले आहे, ती लिहिते "आम्ही सोमवारी म्हणजे १५ मार्च रोजी सकाळी ५ वाजून १९ मिनीटांनी ऑस्कर नामांकनं जाहीर करण्यासाठी फार उत्सुक आहोत. आम्हाला लाईव्ह पाहा @TheAcademy, च्या ट्विटर अकाऊंटवर….!”

ही जोडी सोमवारी सर्व २३ विभागातली नामांकनं जाहीर करेल. अकॅडमीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून म्हणजे Oscars.com आणि Oscar.org तसंच अकॅडमीच्या सर्व डिजीटल प्लॅटफॉर्म्सवरून लाईव्ह ग्लोबल स्ट्रिमिंगद्वारे हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

ऑस्कर पुरस्कार सोहळा हा सहसा फेब्रुवारी महिन्यात होतो. पण या वर्षी करोना महामारीमुळे हा सोहळा लांबणीवर पडला असून आता तो २६ एप्रिलला होणार आहे.

Hey @TheAcademy, any chance I can announce the Oscar nominations solo?