नच बलिये ला नकार देत राहूल वैद्य ची 'खतरों के खिलाडी' ला पसंती

नच बलिये ला नकार देत राहूल वैद्य ची 'खतरों के खिलाडी' ला पसंती

 

नच बलिएला नकार देत राहुल वैद्यची 'खतरों के खिलाडी'मध्ये एण्ट्री घेतली आहे. बिग बस १४ सीनचा उपविजेता राहिल दिशा परमार ला प्रपोज केल्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. या जोडीची प्रसिद्धी पाहता राहूल आणि दिशाला नच बलिये ची ऑफर आली होती. त्याचबरोबर राहिल खतरों के खिलाडी साठी देखील विचारणा करण्यात आली होती. 

बिग बॉस १४ नंतर राहुल वैद्यशी 'खतरों के खिलाडी' शोसाठी संपर्क करण्यात आला होता. पण आरोग्याशी संबंधित कारणासाठी राहुलनं सुरुवातीला या शोसाठी नकार दिला होता. पण आता राहुल पूर्णपणे फिट असून त्यानं या शोसाठी मेकर्सना होकार कळवला आहे.

राहुल आणि दिशा परमार यांनी अलिकडेच चंदीगढमध्ये एका म्युझिकल व्हिडीओसाठी चित्रिकरण केले. हाच म्युझिकल व्हिडीओ आणि त्यातील काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले.