वाढदिवशी केली राणीने नव्या सिनेमाची घोषणा

वाचा सविस्तर

वाढदिवशी केली राणीने नव्या सिनेमाची घोषणा

आज बॉलीवूडची मर्दानी अभिनेत्री राणी मुखर्जी आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या या वाढदिवसाचे विशेष म्हणजे, तिने आज तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’असे राणीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. खरं तर, काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, आपल्या वाढदिवसाला राणी मर्दानी ३ ची मोठी घोषणा करू शकते. त्यासाठी तिचे चाहतेही खूप उत्सुक होते. मात्र राणीने नव्या चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला.  

‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होईल. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि एमी इएनटी. करणार आहे. या व्यतिरिक्त राणी मुखर्जी 'बंटी और बबली २' या चित्रपटात झळकणार आहेत. सैफ अली खान यावेळीसुद्धा त्याच्या धमाका करणार आहे. सैफ अली खान आणि राणी मुखर्जी बर्‍याच दिवसानंतर पुन्हा पडद्यावर दिसतील. या चित्रपटात राणी आणि सैफ व्यतिरिक्त सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी देखील मुख्य भूमिकेत आहेत. बंटी और बबली २ बद्दल बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.