रिया चक्रवर्ती पुन्हा पडली प्रेमात!

रिया चक्रवर्ती पुन्हा पडली प्रेमात!
Instagram account

रिया चक्रवर्ती हळूहळू आपले जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे.  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचे नाव खूप चर्चेत होते. अभिनेत्याच्या मृत्यूनंतरच रियानेच या गोष्टीची पुष्टी केली होती की, ती सुशांतची गर्लफ्रेंड आहे. मात्र, त्यानंतर रियाला सुशांतच्या चाहत्यांनी ट्रोल केले होते. मात्र आता रियाने दूसरा पार्टनर शोधला आहे. रिया अभिनेता साकीब सलीमला डेट करत असल्याचे दिसतेय. अलीकडेच दोघेही अलिबागहून पार्टी करून येत असल्याचे दिसून आले. 

यादरम्यान हे दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसले. रियाने प्लेन टी शर्ट आणि जीन्स परिधान केले होते, तर साकीबने शर्ट व पँट परिधान केली होती. दोघेही मीडियासमोर उभे राहिले नाहीत आणि तेथून थेट निघून गेले. असे म्हटले जात आहे की, रियाने साकीबचा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा केला आहे आणि यावेळी मनीष मल्होत्रा ​​देखील त्यांच्यासोबत होता.

काही दिवसांपूर्वी रियाने एक फोटो शेअर केला आणि प्रेमाबद्दल काही गोष्टी लिहिल्या होत्या. तिने एका मैत्रिणीबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना रियानेही लिहिलं, ‘प्रेम म्हणजे ताकद … प्रेम म्हणजे एक कपडा ज्याचा रंग कधीच हलका होत नसतो. कितीही धुतले तरी फरक पडत नाही.

रिया आगामी ‘चेहरे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमधून रियाला दूर ठेवण्यात आले होते. मात्र, रिया या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली होती. तिला मोठ्या पडद्यावर पाहून रियाचे चाहते देखील उत्साही झाले आहेत.