स्मिता गोंदकर बनली क्षण मोहरणारी 'साजणी'

सप्तसूर म्युझिकची प्रस्तुती

स्मिता गोंदकर बनली क्षण मोहरणारी 'साजणी'

'साजणी तू क्षण मोहरणारा, साजणी तू चांद राती तारा' अशी उत्तम रचना असलेल्या साजणी तू या म्युझिक व्हिडिओमधून अभिनेत्री स्मिता गोंदकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. संगीत दिग्दर्शक आदित्य बर्वेनं या म्युझिक व्हिडिओचं संगीत आणि दिग्दर्शन केलं आहे. सप्तसूर म्युझिकची प्रस्तुती असलेल्या या व्हिडियोला अल्पावधीतच भरघोस प्रतिसाद लाभला आहे. 

सप्तसूर म्युझिक प्रस्तुत "साजणी तू...." या म्युझिक व्हिडिओची निर्मिती व्हीबी फिल्म्स आणि सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अंबरीश देशपांडेनं लिहिलेलं हे गाणं ऋषिकेश रानडेनं गायलं आहे. अशोक पवार या म्युझिस व्हिडिओचे छायालेखक आहेत. रोहन गोगटे, अजित नेगी यांनी संकलन केलं आहे. 

अभिनेत्री स्मिता गोंदकरनं आतापर्यंत काही म्युझिक व्हिडिओ केले आहेत. मात्र बऱ्याच काळानंतर स्मिता पुन्हा एकदा साजणी तू या म्युझिक व्हिडिओद्वारे या माध्यमाकडे परतली आहे. उत्तम शब्द, श्रवणीय संगीत, देखणं छायाचित्रण असा योग या म्युझिक व्हिडिओमध्ये जुळून आला आहे. त्यामुळे सप्तसूर म्युझिकच्या  म्युझिक व्हिडिओंना आतापर्यंत मिळालेला भरभरून प्रतिसाद पाहता 'साजणी तू' सुद्धा प्रेक्षकांची दाद मिळवणार यात शंकाच नाही.