सतिश कौशिक करोनाबाधित

ट्विटरवरून दिली माहिती

सतिश कौशिक करोनाबाधित

अनलॉक नंतर पुन्हा एकदा करोना बाधितांची संख्या देशात वेगाने वाढताना दिसत आहे. अनेक प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याची बातमी येत आहे. कोरोनाबाधित सेलिब्रिटींच्या या यादीत आता सतिश कौशिक ह्या नावाची नव्याने भर पडली आहे. सतीश कौशिक यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

सतिश म्हणतात, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील, त्या सर्वांनी करोना चाचणी करुन घ्यावी अशी विनंती करतो. मी होम क्वारंटाईन आहे. तुमचं प्रेम, शुभेच्छा, आशिर्वाद यांची मदत होईल. धन्यवाद.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार करोनाबाधित असल्याची माहिती मिळत आहे. यात रणबीर कपूर, संजय लील भन्साळी, मनोज वाजपेयी, सिद्धातं चतुर्वेदी, आशिष विद्यार्थी, उमेश कामत, प्रिया बापट अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात या विषाणूचा प्रभाव सर्वाधिक असल्याचं दिसून येत आहे.