साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यची बॉलीवुडमध्ये ईन्ट्री!

लाल सिंग चड्डा मध्ये आमीर सोबत स्क्रीन करणार शेअर

साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यची बॉलीवुडमध्ये ईन्ट्री!

सुप्रसिद्ध साउथ स्टार नागा चैतन्या लवकरच बॉलिवूडमध्य़े एण्ट्री करणार आहे. लोकप्रिय अभिनेत नागार्जुन यांचा मुलगा असूनही त्याने अभिनयात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय  आहे. नागा चैतन्यचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या तो त्याच्या ‘थँक यू’ आणि ‘लव्ह स्टोरी’ या सिनेमांमुळे चर्चेत आहे. यातच आता नागा चैतन्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत तो झळकणार आहे. एका वृत्तानुसार नागा चैतन्याला ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमासाठी कास्ट करण्यात आले आहे.

या वृत्तानुसार नागा चैतन्याला लाल सिंह चड्ढा या सिनेमात साउथ इंडयन सुपरस्टार विजय सेतुपति याच्या जागी कास्ट केलं गेले आहे. याआधी या सिनेमासाठी विजय सेतुपति याला कास्ट करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव विजयला या सिनेमातून काढून टाकण्यात आले असून त्याजागी नागा चैतन्याला कास्ट करण्यात आले आहे.

या सिनेमात नागा चैतन्या आमिरच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. मे महिन्यापासून तो या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात कऱणार आहे. मात्र नागा चैतन्याच्या या बॉलिवूड पदार्पणाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. १९९४ साली आलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड सिनेमाचा हा रिमेक आहे. त्याचसोबत बाबरी मशीदीच्या विध्वंसाची पार्श्वभूमी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. आमिर खान या सिनेमात एका शीख व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे. तर करीना कपूर त्याच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल. अतुल कुलकर्णी यांनी या सिनेमाची कथा लिहली आहे.