सोनाक्षी चा 'दबंग' अवतार होतोय व्हायरल

ओटीटी वर दमदार डेब्यू करणार

सोनाक्षी चा 'दबंग' अवतार होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. यावेळी देखील तिच्या एका पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने हि पोस्ट जागतिक महिला दिनी आपल्या सोशल मीडिया साईटवर टाकली होती, ज्यात तिने तिच्या आगामी वेबसिरीजबद्दल सांगितले आहे. या वेबसिरीजमध्ये ती खाकी वर्दीतील महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 


सोनाक्षीने या भूमिकेतला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यात ती रेल्वे रुळाच्या पटरीवर उभी आहे. या फोटोमध्ये तिचा दमदार अंदाज पाहायला मिळतो असून, या माध्यमातून आपण ओटीटी वर दमदार डेब्यू करणार असल्याचे तिने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. 

अमेझॉन प्राईमवरील एका वेब सिरीजमधून ती झळकणार आहे. अद्याप या सीरिजचे नाव आणि रिलीज डेट समजू शकलेली नाही. या वेबसिरीजमध्ये अभिनेता विजय शर्मा, गुलशन देवया आणि सोहम शहा यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. या वेबसिरीजचे दिगदर्शन रीमा कागती आणि रुचिका अग्रवाल यांनी केले आहे.