अपघातातून सुखरूप बचावला सुयश 

अपघातातून सुखरूप बचावला सुयश 

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सुयश टिळक याचा अपघात झाल्याचे वृत्त समझताच त्याचे मित्रमंडळी आणि चाहत्यांचे काळीज धस्स झाले होते. अपघाताबद्दल माहिती मिळतेय का? सुयश कसा आहे? तो कुठे प्रवास करत होता असे अनेक प्रश्न त्यांना पडली होती. त्यामुळे, सुयशनं स्वतः सोशल मीडियावर येत आपण सुखरूप असल्याचं सांगितलं आहे.

सुयश प्रवास करत असलेल्या गाडीचा २८ फेब्रुवारी रोजी पहाटे अपघात झाला. सुशय त्याच्या स्वत:च्या गाडीने नव्हे तर कॅबनं प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान एका मालगाडीची सुयशच्या गाडीला धडक लागली, गाडी रस्ता सोडून बाजूला फेकली गेली उलटली. अपघातात गाडीचं बरंच नुकसान झालं असून सुयश आणि गाडीचा चालक यांना मात्र सुदैवानं गंभीर ईजा झाली नाही. प्रसंगसावधान राखत सुयशनं चालकाला तत्काळ सुखरूप गाडीच्या बाहेर काढलं आणि त्याला मदत केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुयशनं चाहत्यांचे आभार मानत माणूसकी जीवंत असल्याचं म्हटलं आहे.

त्यानंतर या पोस्टवर सायली संजीव, पियुष रानडे यांसारख्या त्याच्या मित्रमंडळीनी त्याला स्वत:ची काळजी घे अशी कमेंट केलेली दिसून येते. सुयशने त्यानंतर हॅशटेग प्रेम ह्या त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर देखील सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.  त्याचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.