‘दो बारा’ तापसी पन्नूचा नवा रहस्यपट

दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपच्या 'दो बारा' चा टीझर प्रदर्शित

‘दो बारा’ तापसी पन्नूचा नवा रहस्यपट

दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपने त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘दो बारा’ असं या सिनेमाचं नाव असून तापसी पन्नूची या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. नुकताच ह्या  चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून तो अनुराग कश्यप आणि तापसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अत्यंत रहस्यमय आणि उत्सुकता ताणणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत आहे.

प्रदर्शित झालेल्या टीझरवरुनच हा सिनेमा थ्रीलर असल्याचं लक्षात येतं. “या ब्रम्हांडाच्या काळचक्रात तुम्ही प्रवास करता तेव्हा काय घडतं पहा” असं म्हणत अनुराग कश्यपने टीझर शेअर केला आहे. टीझरवरुन हा सिनेमा टाईम ट्रॅव्हलवर आधारित असेल याचा अंदाज येतो. या सिनेमाच्या टीझरमध्ये तापसीसोबत अनुराग कश्यपही पाहायला मिळत आहे. तापसी पन्नूच्या खोलीतील टीव्हीत अनुराग अचानक प्रकट होतो आणि तिच्याशी संवाद साधतो.

त्यांच्यातील रहस्यपूर्ण संवादावरुनच अनेकांची उत्सुकती ताणली गेली आहे. ह्या टीझरच्या अंती जे शीर्षक येत ते देखील लक्षवेधी आहे. दोन वाजून बारा मिनिटे असा आकडा आपल्याला दिसून येते, अर्थात ह्याच हिंदी मध्ये 'दो बारा' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. 

 एकता कपूरनेही या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. ‘बदला’ या सिनेमानंतर तापसीचा हा दुसरा रहस्यमय सिनेमा आहे. तर रहस्यमय सिनेमा करणं मला कायम आवडतं असल्याचं तापसीनं म्हंटलंय. सप्टेंबर २०२१ मध्ये ‘दो बारा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच तापसीच्या ‘लूप लपेटा’ या सिनेमाचंही पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून ते देखील तिने शेअर केलं आहे.