‘द व्हाईट टायगर’ला ऑस्कर नॉमिनेशन!

‘द व्हाईट टायगर’ला ऑस्कर नॉमिनेशन!
‘द व्हाईट टायगर’ला ऑस्कर नॉमिनेशन!

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता राजकुमार राव यांचा ‘द व्हाईट टायगर’ हा चित्रपट वर्षाच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियंका आणि राजकुमारसह गौरव आदर्श मुख्य भूमिकेत दिसला होता. प्रियंका चोप्रा हिने पती निक जोनाससमवेत सोमवारी ऑस्कर 2021ची नामांकन जाहीर केली आणि या यादीमध्ये त्यांचा ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटाने देखील आपले स्थान मिळवले आहे.

प्रियंका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले आहे.

‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटाचा अडॉप्टेड स्क्रीनप्ले प्रकारात समावेश करण्यात आला आहे. ऑस्करमध्ये नामांकन मिळाल्यानंतर प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. प्रियंका चोप्राने ट्विट केले की, ‘आम्हाला ऑस्करमध्ये नामांकन मिळाले आहे. ‘द व्हाईट टायगर’ टीम आणि रमीन तुम्हाला खूप शुभेच्छा. चित्रपटाची नामनिर्देशन स्वत: जाहीर करताना मला खूप आनंद वाटला. मला सर्वांचा अभिमान आहे.’

राजकुमार राव यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आनंद व्यक्त केला. त्याने लिहिले, ‘आम्हाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले आहे. अभिनंदन रामीन बहरानी आणि ‘द व्हाईट टायगर’ टीम.’ राजकुमार याच्या या पोस्टनंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

राजकुमार रावची इंस्टाग्राम पोस्ट :

‘द व्हाईट टायगर’समवेत ‘द फादर’, ‘नोमॅडलॅड’, ‘वन नाईट इन मियामी’ यांना अडॉप्टेड स्क्रीनप्ले प्रकारात नामांकन देण्यात आले आहे.