सोनाली कुलकर्णीच्या घरात घुसखोरी, वडीलांवर चाकूने हल्ला

सोनाली कुलकर्णीच्या घरात घुसखोरी, वडीलांवर चाकूने हल्ला

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या राहत्या घरी अज्ञाताने घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. सोनाली कुलकर्णी यांच्या घरी वडिलांवर अज्ञाताने हल्ला केला असून या प्रकरणी निगडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोनाली ने काही दिवसांपूर्वीच लग्न केले असल्याची माहिती सोशल मीडियावर देत चाहत्यांना धक्का दिला होता. संध्या सोनाली आपल्या पतीच्या घरी राहत असून, लग्नापूर्वी आपल्या आईवडिलांसोबत ती पुण्याच्या घरात राहत होती. 
मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास चोर शिरला त्यावेळी घरी सोनालीचे आई वडील होते. चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोनाली यांच्या वडिलांनी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने चाकूने त्यांच्यावर वार केला. या प्रकरणाची माहिती मिळताच गुन्हेगारांना काही घटनास्थळी दाखल झाले. आणि आरोपीला ताब्यात घेतले. चोरी करायला आलेल्या आरोपीचे नाव अजय शेगटे आहे. तो सोनाली चा चाहता असल्याचे  म्हंटले जाते. आता ताब्यात घेतले असून. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.