'तुझ्यात जीव रंगला'मधल्या राणादाचा नवीन व्यवसाय

'तुझ्यात जीव रंगला'मधल्या राणादाचा नवीन व्यवसाय

तुझ्यात जीव रंगला'मधल्या राणादाने केवळ कोल्हापूरकरांच्या मनात नव्हे तर संपूर्ण महाराष्टातील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच निरोप घेतला होता. त्यामुळे राणादा आता नेमका काय करत असेल याचे कुतुहला त्याच्या चाहत्यांना होते. तर सर्वांचा लाडका राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी स्वत:चा एक नवीन व्यवसाय सुरू करत असल्याच कळतंय. कोल्हापूर बदाम थंडाई ची फक्कड ट्रिक घेऊन तो आला आहे. सोशल मीडियावर या संबंधीचा व्हिडीओ पोस्ट करत हार्दिकने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. 
 

Click the image to visit Instagram

 

'आजवर तुम्ही माझ्यावर व माझ्या कामावर खूप प्रेम केलंत. आता मी व्यवसायात पदार्पण करत आहे. या पुढेही आपला असाच पाठिंबा कायम माझासोबत राहील हा मला विश्वास आहे. कोल्हापूर बदाम थंडाई, दिनांक २५ फेब्रुवारी म्हणजे आजपासून आपल्या सेवेत...मग काय येणार नव्हं? यायला लागतंय...चालतंय की..या सायंकाळी ४ नंतर, खाऊ गल्ली खासबाग मैदान कोल्हापूर,' असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या व्हिडीओद्वारे त्याच्या नवीन व्यवसायाला पाठिंबा देण्याची विनंती हार्दिकने चाहत्यांना केली आहे. 

 

मनोरंज क्षेत्रातील कलाकार व्यवसायात उतरत असल्याची हि पहीiलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरेने देखील आपल्या डिओ चे उदघाटन केले होते. तसेच साई ताम्हणकर हिने साडीचा व्यवसाय सुरु केला असून, अपूर्वा नेमळेकर दागिन्याच्या व्यवसाय करत आहे.