सुप्रसिद्ध जोडी उमेश - प्रियाला कोरोनाची लागण

सुप्रसिद्ध जोडी उमेश - प्रियाला कोरोनाची लागण

सोशल मीडियावर सक्रिय असणारी मराठी मनोरंजन विश्वातली प्रसिद्ध जोडी अर्थात अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापटला कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः उमेश कामतने सोशल मीडियावर ही पोस्ट लिहित सूचित केले आहे. 

दोघांची कोव्हिड-१९ चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. उमेश या पोस्टमध्ये लिहीतो की, ‘दुर्दैवाने माझी आणि प्रियाची कोरोन चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्या आम्ही घरात सेल्फ क्वारंटाईन आहोत. आवश्यक ती औषधे घेत आहोत आणि सावधगिरी देखील बाळगत आहोत. सगळ्या नियमांचेही पालन करत आहोत. मागील आठवड्यात जे कुणीही आमच्या संपर्कात आले असतील, त्यांनी देखील कोव्हिड चाचणी करुन घ्यावी किंवा स्वत:ला आयसोलेट करावे.’ 

उमेश आणि प्रिया सध्या त्यांच्या आगामी वेब सीरीजच्या चित्रीकरणात व्यस्त होते. तर, त्यांच्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे प्रयोग देखील नुकतेच सुरु झाले होते. उमेश आणि प्रिया सध्या घरातच सेल्फ क्वारंटाईन झाले असून, त्यांनी त्यांच्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उमेश कामत आणि प्रियाची ही बातमी कळताच सगळे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. प्रिया आणि उमेशने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय वेब सीरीजच्या दुसर्‍या सीझनसाठी एकत्र शूटिंग सुरू केली होती. याशिवाय ते ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या मराठी नाटकासाठी टूर करण्यात व्यस्त होते. या जोडप्याने २०११ मध्ये लग्न गाठ बांधली होती आणि त्यांनी ‘टाईम प्लीज’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते.