विरुष्काच्या घराची नेमप्लेट चर्चेत

विरुष्काच्या घराची नेमप्लेट चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपट्टू विराट कोहली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड आहे. ही दोघे सोशल मैद्याच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. नुकताच, वीरूष्काने आपल्या लेकीचा दोन महिन्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. मात्र, चाहत्यांना अद्याप त्यांच्या लेकीचा पूर्ण चेहरा पाहता आलेला नाही, पण वामिका विषयीची आणखीन एक बातमी चर्चेत आली आहे, ती म्हणजे विरुष्काच्या नेमप्लेटवर चिमुकल्या वामिकाचे नाव देखील आता झळकू लागले आहे. 

सध्या विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत, भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये आहे त्या हॉटेलमध्ये खेळाडूंना घरासारखे वातावरण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी नेमप्लेटसह खोलीचे नंबरही बदलले आहेत. झूमच्या अहवालानुसार, कॅप्टन विराटच्या खोलीबाहेर एक खास नेमप्लेट लावण्यात आली आहे. ज्यात विराट, त्याची पत्नी-अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि त्यांची दोन महिन्यांची लेक वामिका अशी तीन नावे आहेत.

या दाम्पत्यांनी त्यांच्या बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल अनुष्काने सांगितले की, "आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु".