वयाच्या ८३ व्या वर्षी या वहीदा रहमान ने केले वॉटर स्नॉर्कलिंग!

वयाच्या ८३ व्या वर्षी या वहीदा रहमान ने केले वॉटर स्नॉर्कलिंग!

ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी तरुणांना लाजवेल असा पराक्रम केला आहे. त्यांनी वॉटर स्नॉर्कलिंग करत आपण आताही पुर्ण फीट असल्याचे सिद्ध केलं आहे. सध्या सोशल मीडियावर वहीदा यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्या सुट्ट्यांचा आनंद घेत असून समुद्रातील अॅडवेंचरची मजा घेत असल्याचे दिसत आहे. ८३ वर्षांच्या वहीदा यांनी समुद्रात स्नोर्कलिंग करत चाहत्यांची मने जिंकली. 

वहीदा या सध्या मुलगी काश्वी रेखीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अंदमानला गेल्या आहेत. काश्वीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तेथील काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये वहीदा यांनी मुलीसोबत स्नोर्कलिंग करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा पाण्याच्या आतील फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

काश्वीने आई वहीदा यांच्यासोबतचा फोटो शेअर करत ‘आईसोबत स्नोर्कलिंग #waterbabies’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी वहीदा यांची प्रशंसा केली आहे. एका यूजरने ‘मला हे पाहून प्रचंड आनंद झाली की वहीदा या त्यांची बकेट लिस्ट पूर्ण करीत आहेत. वय हा केवळ एक आकडा आहे’ असे कमेंट करत म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘वहीदा यांना पाहून प्रेरणा मिळते’ असे म्हटले आहे.