'कोण होणार करोडपती?' चं चौथं पर्व लवकरच !

कोण करणार सूत्रसंचालन ?

'कोण होणार करोडपती?' चं चौथं पर्व लवकरच !

'बिग बी' अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजातील सुत्रासंचालनातून सजलेला 'कोण बनेगा करोडपती' शोने हिंदीच्या छोट्या पडद्यावर अनेक काळ अधिराज्य केले. 'केबीसी' ची ही प्रसिद्धी पाहता प्रादेशिक भाषांमाध्येदेखील या शोचा सिक्वेल चांगलाच गाजला. अर्थात मराठीत देखील 'कोण होणार करोडपती' या नावाने या शोने यशस्वी पदार्पण केले आहे. दरम्यान, ह्या शोच्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर यांनी केले होते, तर दुसरे पर्व अभिनेता स्वप्नील जोशी आणि तीसरे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सूत्रसंचालनामुळे चांगलेच गाजले. त्यामुळे, आता पुन्हा एकदा 'कोण होणार करोडपती' चे चौथे पर्व घेऊन येत असल्याची घोषणा सोनी मराठी वाहिनीने करत, चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सोशल मिडियावर आगामी पर्वचा प्रोमो शेअर करत मराठी केबीसी पुन्हा येत असल्याची अधिकृत घोषणा वाहिनीने केली आहे. 

 

 

 

मराठी केबिसीला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता, चौथे पर्व देखील टीआरपीचा उच्चांक गाठेल असा विश्वास आहे. तसेच, या पर्वाचे खुमासदार सूत्रसंचालन कोण करेल? कोणाच्या दिग्दर्शनाखाली यंदाचा शो चालेल? हे अद्याप समजू शकले नसले तरी लवकरच त्याचा उलगडा होणार आहे.